PostImage

सुपर फास्ट बातमी

Jan. 17, 2024   

PostImage

Sanjay Raut: शिंदे गटाचे नेते लफंगे, पळपुटे, गुलाम असून, ईडीला …


कराड: दिल्लीत मुजरे घालण्यात दीड वर्षे घालवणारे मुख्यमंत्री दिल्लीचा गुलाम माणूस. शिंदे गटाचे नेते लफंगे, पळपुटे, गुलाम असून, ईडीला घाबरून पळालेले हे लोक सत्तेसाठी हपापलेले आणि डरपोक आहेत , आम्ही लढू आणि त्यांना गाढू असा हल्लाबोल शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी चढवला.सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी राजनीदेवी यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाल्यामुळे पाटील परिवाराचे सांत्वन करण्यासाठी संजय राऊत कराडमध्ये आले होते. तिथून बाहेर पडल्यानंतर कार्यकर्त्यांच्या भेटीवेळी तातडीने उपस्थित झालेल्या माध्यम प्रतिनिधींशी ते बोलत होते.शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे व संजय शिरसाठ आदी नेत्यांनी केलेल्या बोचाऱ्या टिकेसंदर्भात पत्रकारांनी छेडले असता खासदार राऊत यांनी टिकाकारांबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एकूणच शिंदे गटावर टीकेची झोड उठवली.

 

शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांच्या टिकेला उत्तर देताना, होय. आम्ही गावोगावी जावून डोंबाऱ्याचाच खेळ करू आणि डोंबाऱ्याच्या चाबकाने (हंटर) शिंदे गटाच्या नेत्यांना फोडून काढू असा इशारा राऊत यांनी दिला.दादा भुसे यांच्या टीकेवर बोलताना कोण दादा भुसे? असा प्रश्न करून, त्यांचीच मान वाकडी होण्याची वेळ आल्याचा टोला राऊतांनी लगावला. आम्ही ताठ मानेचे आहोत. शिवसेना प्रमुखांनी ताठ मानेने जगायला शिकवलं. म्हणूनच शिवसेना ताठ मानेने जगणारी संघटना आहे. शिवसेना तुमच्यासारख्या लफंग्यांची टोळी नसून, तुम्ही सारे पळपुटे आहात, शिंदे गटाला माझी भीती वाटते, आणि ती वाटायलाचा पाहिजे, २०२४ हे वर्ष सुरु झाले असून, त्यातील निवडणुकात सत्य लवकरच कळेल असा घणाघात राऊतांनी केला. विधानसभेत शिंदे गटाचा एकही आमादार दिसणार नाही, लिहून ठेवा असा दावा इथेही खासदार राऊत यांनी बोलून दाखवला.

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करताना, संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्र्याला काय गांभीर्याने घेताय? दिल्लीत मुजरे घालण्यात दीड वर्षे घालवणारा हा दिल्लीचा गुलाम माणूस आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण, आचरण काय आहे का त्याच्याकडे? सवाल राऊत यांनी केला.भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत आसलेल्या महायुतीच्या मेळाव्यासंदर्भात विचारले असता, छत्रपती महायुतीचे नेते. त्यांनीं ज्या पक्षात आपण आहोत त्या पक्षाशी इमान राखले पाहिजे असा चिमटा खासदार संजय राऊत यांनी काढला.